Header Ads

चाल तुरु तुरु Song Lyrics | Chal Turu Turu | Sonali Sonawane, Abhijeet Sawant



नमस्कार या पोस्टमध्ये आपण चाल तुरु तुरु Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - चाल तुरु तुरु
लिरिक्स - स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाट (शांत शेळके)
सिंगर - अभिजीत सावंत, सोनाली सोनावणे
म्युझिक - प्रसाद - गणेश
म्युझिक लेबल - सारेगामा मराठी


चाल तुरु तुरु Song Lyrics | Marathi

तिच्या वेणीची बट सुटली,
अन कविता मज सुचली
तिच्या रूपाला मी भुललो असा
माझी कविता थोडी चुकली...

का बरं...

ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
तुझी पाहून अदा मी झालो फिदा
माझी कविता थोडी चुकली...

ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
तुझी पाहून अदा मी झालो फिदा
माझी कविता थोडी चुकली...

(डोळ्यात काजळ ओठावर लाली
प्रेमाच फुल रुसलं, केसात गजरा 
तीळ तो गाली, कोण फुगून बसलं )

रुसू नको मुसु नको
माझ्या अबोलीच्या फुला
सोड अबोली हा अबोला
किती समजावू तुला
हा राग जीव घेणा
खोटा खोटा च बहाना

आता माझी मला उन कळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या पानात
नागिन सळसळली...

ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
तुझी पाहून अदा मी झालो फिदा
माझी कविता थोडी चुकली...

इथं कोणी आसपास ना
डोळ्यांच्या कोणात हास ना
तू जरा माझ्याशी बोल ना
ओठांची मोहर खोल ना

तू लगबग जाता मागं वळून पाहता
वाट पावलात अडखळली
माझी पाहून अदा तू झालाय फिदा
तुझी कविता ही थोडी चुकली...

⚛ ⚛ ⚛ ⚛ ⚛




हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण चाल तुरु तुरु Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.