Hambarun Vasarale Lyrics In Marathi | हंबरून वासराले चाटती
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Hambarun Vasarale Lyrics In Marathi मधून वाचायला मिळतील . या गाण्याचे बोल एस . जि . पाचोळ यांनी लिहिले आहेत . तसेच हे गाणे मराठी कविता " माय " मधून घेण्यातआलेले आहे.
Hambarun Vasarale Lyrics | Marathi
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले
आया बाया सांगत व्हत्या होतो जवा तान्हा
दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा
पीठा मंदी पीठा मंदी
पाणी टाकून मले पाजत जाय
तवा मले पीठामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …
कान्याकाट्या वेचायला माय जायी रानी
पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी
काट्याकुट्या
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …
बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झाला शिक्षान आता घेऊदी हाती कामं
शिकून शानं शिकून शानं
कुठं मोठा मास्तर होणार हाय
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …
दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
थर थर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या कसायाच्या
दावणीला बांधली जसी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …
बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
सांग म्हणे राजा तुजी कवा येईल राणी
भरल्या डोळ्यान
भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले …
म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जन्म घेवा माये तुझी पोटी
तुझ्या चरणी तुझ्या चरणीठेवून माया धरावं तुजं पाय
ठेवून माया धरावं तुजं पाय
वा मले पायामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …
हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय
दिसती माझी माय
हंबरून वासराले
दिसती माझी माय
दिसती माझी माय
दिसती माझी माय
- May Marathi Kavita
- Bap Kavita In Marathi
- Aaji Kavita In Marathi
- ग दि माडगूळकर यांच्या कवितांचा संग्रह
- शांता शेळके यांच्या कविता
- मजेदार हास्य कविता
तर मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Hambarun Vasarale Lyrics In Marathi बघितले. तुम्हाला हे आवडले असतील तर मला कंमेंट मध्ये नक्की सांगा . आणि मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा जरूर भेट द्या .
धन्यवाद !!!!!
Post a Comment