लग्न कविता मराठी संग्रह | Lagna Kavita Marathi Sangrah
नमस्कार स्वागत आहे तुमचं 🙏🙏🙏 True Marathi Lyrics वर !!!! आज या पोस्ट मध्ये आपण लग्न कविता मराठी संग्रह बघणार आहोत. लग्नावर आधारित कविता इथे तुम्हाला वाचायला मिळतील. लग्न हा प्रत्येकासाठी खास विषय असतो.
कधी विनोदाने घेतले जाणारं तर कधी आयुष्याच्या कठीण वळणावर साथ देणारं असं हे सुंदर नातं असतं. काही विनोदी तर काही प्रेमाच्या कविता मी इथे घेतल्या आहेत. तुमच्यासाठी लग्न म्हणजे काय ते तुम्ही खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग वेळ ना घालवता वळूया कवितांकडे -
________________
💖लग्न कविता मराठी संग्रह | Marathi💖
कविता - 1 >> " लग्न " म्हणजे नेमकं काय ??
'लग्न' हे असे सुंदर अभयारण्य (जंगल) आहे.
जिथे 'बहादुर वाघांची' शिकार, मोहक हरिणी करतात...
लग्न म्हणजे -'अहो ऐकलंत का ?'
पासुन ते 'बहिरे झालात की काय ?'
पर्यंतचा प्रवास...
लग्न म्हणजेच -'तुझ्यासारखे
या जगात, कुणीच नाही' पासून,
'तुझ्या सारखे छप्पन बघितलेत'
पर्यंतचा प्रवास...
लग्न म्हणजे -'तुम्ही राहू द्या'
पासुन ते 'मेहरबानी करून
तुम्ही तर राहुच द्या'" पर्यंतचा प्रवास ...
कविता - 2 >> लग्न...
लग्न म्हणजे काय असतं
दोन जीवांचा मेळ असतो
राजा राणीचा मांडलेला...
भातुकलीचा खेळ असतो
म्हणतात मुलीचं घर सोडणं
तिच्यासाठी खूप अवघड असतं
पण आपल्या जगात दुसऱ्याला आणणं
हे मुलांसाठी पण सोपं नसतं
हल्ली लग्न पद्धती बदलल्या असतील
पण लग्नाचा अर्थ नाही
मग ठरवून झालं किंवा प्रेमविवाह
त्याने फरक पडत नाही
मंगल अष्टकाचा गुंज झाला
जुळून आले नाते प्रेमाचे
दोघांच्या सुखी संसारासाठी
टाका आशीर्वाद अक्षताचे
सप्तपदीचे सात पाऊले वचने देखील सात
प्रत्येक वचना सोबत दोघांना एकमेकांची साथ
कविता - 3 >> लग्न म्हणजे....
लग्न म्हणजे....
एक अशी रेशीम गाठ
जशी सोनेरी किरणांची पहाट
कडू आणि गोड क्षणांची लाट
जन्मभर समजूतदारपणाची साथ
लग्न म्हणजे.....
एकमेकांना एकमेकांचा वेळ
आपुुलकी आणि स्नेहाने भरलेला
दोन कुटुंबाचा मेळ
लग्न फक्त पाहिलं
तर अर्धवट वाटतं
केलं कि सोपं वाटतं
अनुभवलं कि अवघड वाटतं
आणि जर ते निभावलं
तर संपूर्ण वाटतं
सोप्या शब्दात सांगायचं झालं
तर लग्न म्हणजे आयुष्य
आयुष्य म्हणजे रुसवे फुगवे
रुसवे फुगवे म्हटलं कि समजूतदारपणा
समजूतदारपणा आला की काळजी
काळजी आली कि जाणीव
जाणीव झाली कि प्रेम
आणि प्रेम म्हणजे ती आणि तो
- राकेश शिंदे
कविता - 4 >> सप्तपदींचे सात वचन
सात फेरे हे सप्तपदींचे
ऋणानुबंध सात जन्माचे
सात वचने ही सह जीवनाची
सुरुवात करूया नव्या युगाची
विवाह जरी हे बंधन असले
बंधनात कधी ना ठेवेन तुला
पहिले वचन सखे देतो तुला
सदा आनंदी ठेवेन तुला
जर कधी भासले मला असे
संपूर्ण जग तुझ्या विरोधी जसे
दुसरे वचन प्रिये देतो तुला
आजन्म साथ देईन तुला
तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हे
सदा बहरू दे असेच
हे तिसरे वचन साजणी देतो
तुला आयुष्यभर असेच खुलवेन तुला
तुझी स्वप्ने पाहण्यास
स्वतंत्र आहेस सदैव
तू चौथे वचन मनमोहिनी देतो तुला
स्वप्नातील तू मिळवून देईल तुला
कितीही व्यस्त असलो तरी
दु:खाचे डोंगर कोसळले जरी
पाचवे वचन प्राण प्रिये देतो तुला
माझा संपूर्ण वेळ नेहमी देईन तुला
आजपर्यंत ज्या सुखासाठी व्याकुळ झाली
सबंधांमुळे मनासारखी जगली नाहीस
सहावे वचन सहजीवनी देतो तुला
प्रत्येक क्षण सुखात ठेवेन तुला
डोळ्यांतील हे अश्रू तुझे
आता सदैव माझे झाले
सातवे वचन अर्धांगी देतो तुला
शेवटच्या श्वासापर्यंत हसवेन तुला
- प्रियांका कुंभार
कविता - 4 >> लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं
तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं.
त्याच्या प्रश्नाआधी तिचं उत्तर असतं
त्याला लागताच ठसका तिच्या
डोळ्यात पाणी असतं...
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं...
त्याच्या चुकांना तिच्या
पदराचं पांघरूण असतं...
तिच्या दुःखाला त्याच्या
खांद्याचं अंथरूण असतं...
कधी दोन मनांचं मिलन तर
कधी दोन जीवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी
दुसऱ्यानं आवरायचं असतं...
संकटाच्या वादळाला दारातच
थोपवायचं असतं...
प्रेमाचं ते बंधन असतं...
घराचं ते घरपण असतं
#विधात्यानं साकारलेलं
ते एकएक सुंदर स्वप्न असतं...
कविता - 5 >> लग्न म्हणजे सोहळा
लग्न म्हणजे सोहळा
लग्न म्हणजे जिव्हाळा
लग्न म्हणजे सुंदर क्षण
नेहमी हवाहवासा वाटणारा
पण आयुष्यात दुर्मिळच येणारा
लग्न म्हणजे जबाबदारी
तेव्हाच येते प्रेमाची प्रचिती
लग्न म्हणजे कविता जी
संपूच नाही अशी वाटते
आणि खरं म्हणजे तीच
आयुष्यभरासाठी असते
लग्न म्हणजे बंदिश जी
अनेक रागातून फिरते
जी नेहमीच शेवटच्या
श्वासापर्यंत बनलेली असते
लग्न म्हणजे सोहळा
लग्न म्हणजे जिव्हाळा
लग्न म्हणजे अशी आठवण की
जिच्यासाठी धडपडतो प्रत्येक जण
कविता - 6 >> लग्न म्हणजे काय?
करायची कशी ही लग्नाची व्याख्या ?
शाब्दिक-भावनिक वा भावनिक शब्दांत ?
नात्यात नको हे जाळे शब्दांचे वाटते,
असावे केवळ तरंग भावनांचे
नसावी परीक्षा तुझी वा
माझी नसावी भाषा चढाओढीची
आपलेपणाचा असावा स्वीकार
विश्वास हाच खऱ्या नात्याचा आधार
स्वभाव व सवयीच्या
अंतराची पारख असावी
खोल त्यातच तर
दडून बसलेले आहे
लग्नाच्या नात्याचे मोल..
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
________________
तर आज या पोस्ट मध्ये आपण लग्न कविता मराठी संग्रह बघितल्या. कविता कशा वाटल्या नक्की सांगा. पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
________________
Post a Comment