-->

Header Ads

येडू नजर लागल तुला भक्ती गीत Lyrics | Yedabai Song Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण येडू नजर लागल तुला भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.


सॉंग -येडू नजर लागल तुला
लिरिक्स - साजन बेंद्रे
सिंगर /म्युझिक - साजन बेंद्रे


___________________

🌸येडू नजर लागल तुला भक्ती गीत Lyrics🌸

तू अशी नटल्यावर माय काळजी वाटते मला
अग बाई नजर लागेल तुला ग येडू तुला...
माझी येडामाय...
नजर लागल तुला ग येडू तुला... || धृ ||

आहा घेऊन चांदीचा कवड बंध
सोना उगळून लावी गंधक
कशी नटण्यात झाली धुंद
न सुटलाय गजऱ्याचा सुगंध
गरिता पडदा खुला ग येडू तुझा
करिता पडदा खुला...
अग नजर लागेल तुला येडू तुला... || १ |

येडू सात रंगाच्या गोळ्याची ल्याली
आली मासोळी कोळ्याची
अंगठी ल्याली ग पिळ्याची
वजनाला सवा तोळ्याची
कानात खेळतोय झुला ग झुबा
कानात खेळतोय झूला
अग बाई नजर लागेल तुला ग येडू तुला
माझी मैना ग... अग नजर लागेल तुला येडू तुला... || २ ||

एवढं शिंगार लेवूनी
कशी फिरती आमराई वनी
तिला बघून हसलाय धनी
अशी महादेवाची चांदणी
महेश विष्णू साजन च्या
जिवाचा ह्या गलबला
अग बाई नजर लागेल तुला येडू तुला... || ३ ||

तू अशी नटल्यावर माय काळजी वाटते मला
अग बाई नजर लागेल तुला ग येडू तुला...
माझी येडामाय...
नजर लागल तुला ग येडू तुला... ||

___________________


ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

आज या पोस्टमध्ये आपण येडू नजर लागल तुला भक्ती गीत Lyrics बघितले‌.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents