-->

Header Ads

माझ्या मामाची रंगीत गाडी Lyrics | Majhya Mamachi Rangeet Gaadi Kavita



नमस्कार या पोस्टमध्ये आपण माझ्या मामाची रंगीत गाडी Lyrics बघणार आहोत.

____________________

🌷माझ्या मामाची रंगीत गाडी Lyrics | Marathi🌷

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला किल्लाऱ्या बैलांची जोडी हो...

कशी दौडत दौडत येई हो...
मला आजोळी घेऊन जाई हो..
नाही बिकट घाट सारी सपाट वाट
माऊ गालीचे ठाई ठाई हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला किल्लाऱ्या बैलांची जोडी हो...

शीळ घालून मंजूळवाणी हो
माझी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगर माळा हो
गायी किल्प विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात करी सळसळ वात
कशी घूमवी आंबेराई हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला किल्लाऱ्या बैलांची जोडी हो...

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो..
लेक एकुलती नातू एकुलता
किती कौतुक कौतुक होई हो....
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला किल्लाऱ्या बैलांची जोडी हो...

____________________


या कविता पण नक्की वाचा👇👇👇
____________________


आज या पोस्टमध्ये आपण माझ्या मामाची रंगीत गाडी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!

____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents