उजाड उघडे माळरानही कविता | Ujad Ughade Malranahi Kavita
उजाड उघडे माळरानही कविता
स्वागत करण्या वसंत ऋतुचे
रंग उघडले दिशा- दिशांना,
बेरड कोरड इथली सृष्टी
घेऊन आली ती नजराना || १ ||
गर्द पोपटी लेऊन वसणे
मुरडत आली लिंबोनी
जर्द तांबडी कर्णफुलेही
घालून सजली नागफणी ||२ ||
लुसलुस पाने अंगोपांगी
झुले वड हा दंग होऊनी
दुरंगी चुनरीत उभी ही
घाणेरी ही नटूनी थटूनी ||३ ||
सळसळ झळझळ पिंपळ पाने
मऊ मुलायम मोर पिसा परी
सांबर लाल कळ्यांनी लखडून
उभे स्वागता पाणंदी वरी ||४ ||
पळस फुले ही बहरून आली
या मातीच्या अंकावरती
कुसुमे सारी या जगाती
पाहून त्यांना मनात झुरती ||५ ||
आंब्याच्या मोहरातून आली
कोकिळेची सुरेल तान
उजाड उघडे माळरानही
गाऊ लागले वसंत गान ||६ ||
- ललिता गादगे
※ ※ ※ ※
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- पिवळे तांबूस ऊन कोवळे मराठी कविता
- बालकवींच्या निसर्ग कविता मराठी
- छोट्या मराठी कविता
- खबरदार जर टाच मारुनी कविता
तर आज आपण या पोस्टमध्ये उजाड उघडे माळरानही कविता बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment