बा पांडुरंगा तुजविण नाही कुणी वाली Lyrics | Vithal Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण बा पांडुरंगा तुजविण नाही कुणी वाली Lyrics बघणार आहोत.
____________________
बा पांडुरंगा तुजविण नाही कुणी वाली Lyrics
या धरतीच्या पाठीवरती
निळ्या आभाळाखाली
बा पांडुरंगा तुजविण
नाही कुणी वाली...|| धृ ||
देश रक्षक भक्षक बनले
कठीण वेळ ही आली
बा पांडुरंगा तुजविण
नाही कुणी वाली...
स्वार्थ साधू भक्ता चारी
करतात मनमानी
अहो मुद्द्याच्याही टाळूवरचे
लोणी चघळते कोणी
मतलबी दुनियेत आमूचे
जीवन तुझ्या हवाली
बा पांडुरंगा तुजविण
नाही कुणी वाली...|| १ ||
शहरो शहरी मोडू लागल्या
गरिबांच्या त्या झोपड्या
झोपड्या तोडूनी चढू लागल्या
माड्यावरती माड्या..
गरिबांसाठी घरकुल योजना
आली आणि ती गेली
बा पांडुरंगा तुजविण
नाही कुणी वाली...|| २ ||
दया करावी पांडुरंगा
उघडा दयाची द्वार
शेतकऱ्यांच्या आत्महत्या
किती वाढल्या फार
अहो बेकारी न महागाईन
अशी ही किमया केली
बा पांडुरंगा तुजविण
नाही कुणी वाली...|| ३ ||
अंतर्यामी जगाचा स्वामी
अंतरी तू जाणिले
भल्याभल्यांचे भ्रष्टाचार
बाजारात आणिले
न्यायदाता भाग्यविधाता
आमूचा वैभवशाली..
बा पांडुरंगा तुजविण
नाही कुणी वाली...|| ४ ||
सांज सकाळी नाम स्मरितो
करितो भक्ती आरती
भ्रष्टाचारांना देवा तू लवकर
घेऊन जावे वरती
अशी ही परवड झाली
बा पांडुरंगा तुजविण
नाही कुणी वाली...|| ५ ||
देश रक्षक भक्षक बनले
कठीण वेळ ही आली
बा पांडुरंगा तुजविण
नाही कुणी वाली...
____________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- सोडून जाऊ नको रे विठ्ठला Lyrics
- प्रेम हरीच्या बाई हृदयात दाटलं Lyrics
- विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ Lyrics
____________________
आज या पोस्टमध्ये आपण बा पांडुरंगा तुजविण नाही कुणी वाली Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
____________________
Post a Comment