-->

Header Ads

शेगावीचा राणा भक्ती गीत Lyrics | Shegavicha Rana Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण शेगावीचा राणा भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
__________________

🌸शेगावीचा राणा भक्ती गीत Lyrics🌸

पद कमलाने झाली भूमी ही पावन
शेगावीचा राणा गजानन गजानन.... (*२) || धृ ||

जय गजानन श्री गजानन.... (*२)

अजाण बाहू साजरी ही मूर्ती
पसरली ज्याची दाही दिशी कीर्ती
निशीदिन त्याचे करू चिंतन मनन
शेगावीचा राणा गजानन गजानन.... (*२) || १ ||

उष्ट्या अन्ना येई प्रसादाचा वास
गुरुमुखी जाई अमृताचा घास
चमत्कारा तुनी होई सत्याचे दर्शन
शेगावीचा राणा गजानन गजानन.... (*२) || २||

असा माझा गुरु असा माझा स्वामी
धरूनिया उरी माझ्या आत्मारामी
किती किती ओवाळू मी माझे पंचप्राण
शेगावीचा राणा गजानन गजानन.... (*२) || ३ ||

करू पाद्य पूजा गळ्या घालूमाळा
नैवेद्यास ठेवू भक्ती भाव भोळा
शिव अवतारा करू आमंत्रण
शेगावीचा राणा गजानन गजानन.... (*२) || ४ ||

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण शेगावीचा राणा भक्ती गीत Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents