निघालो सातारा वाईला भेटायला काळुबाईला Lyrics | Nighalo Satara Vaila Bhtayala Kalubaila bhaktigeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण निघालो सातारा वाईला भेटायला काळुबाईला Lyrics बघणार आहोत.
सॉंग - निघालो सातारा वाईला भेटायला काळुबाईला
लिरिक्स - पंडित साळवे
सिंगर - आकाश शिंदे
म्युझिक - प्रकाश चौगुले
म्युझिक लेबल - विंग्स म्युझिक
__________________
निघालो सातारा वाईला भेटायला काळुबाईला Lyrics
मांढरची काळू आहे दयाळू
विसरू कसा मी आईला
निघालो सातारा वाईला
भेटायला काळुबाईला..|| धृ ||
गाडी चढती या डोंगरघाटाला
लय अवघड नागमोडी वाट
या मांढरच्या डोंगरात
काळू बसलीया रावळात
काळेश्वरीला महाकालीला
शरण जाईल आईला
निघालो सातारा वाईला
भेटायला काळुबाईला..|| १ ||
काळू काळाची काळेश्वरी
माझी देवी हाय सत्वरी
माया दळली तिच्यात खरी
कृपा हाय तिची माझ्यावरी
दर्शन घेण्या माझ्या काळूच
आलोय लय मी घाईला
निघालो सातारा वाईला
भेटायला काळुबाईला..|| २ ||
काळुबाईचा महिमा थोर
माझं दुःख निवारलं सार
आलो मांढर डोंगरावर
ठेवलं मस्त चरणावर
जत्रा तिची भरते मोठी
चैत्र पुनव रातीला
निघालो सातारा वाईला
भेटायला काळुबाईला..|| ३ ||
मांढरची काळू आहे दयाळू
विसरू कसा मी आईला
निघालो सातारा वाईला
भेटायला काळुबाईला..||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- काळुबाई माझी लाडी ग तीची लागली मला गोडी Lyrics
- काळू नेसली पातळ नव्वार Lyrics
- Superhit Kalubai Song Lyrics | काळुबाईची गाणी
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण निघालो सातारा वाईला भेटायला काळुबाईला Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment