-->

Header Ads

आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत भक्ती गीत Lyrics | Khandoba BHaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
__________________

🌸आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत भक्ती गीत Lyrics 🌸


साऱ्या भाविक भक्तांचं जिवाभावाचं नातं
आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत..|| धृ ||

नऊ लाख पायरीची ही जेजुरी सोन्याची
वाघ्या मुरळी नाचती मजा येतीया गाण्याची
दीपमाळा घरोघर जळती दिवटीची ज्योत
आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत..|| १ ||

शिवलिंग आकाराचा हा गड जेजुरी
इथं उतरीला राणा कैलास पर्वताचा
डमरू त्रिशूळ हाताला चमके तलवारीची पात
आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत..|| २ ||

म्हाळसा बानू दोन्ही आई तिचा देव खंडेराया
पिल्लं पाखर त्या दारी येती गाऱ्हाण सांगाया
सदानंदाचा येळकोट तिथं येतोया दिनरात
आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत..|| ३ ||

त्याच्या कृपा प्रसादाने मनोरथ होई पुरे
वाहे अखंड जीवनावर सदा मायेचे वारे
जीवा लाभतो विसावा त्याच्या पवित्र चरणात
आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत..|| ४ ||

साऱ्या भाविक भक्तांचं जिवाभावाचं नातं
आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत..||

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇


__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण आले भंडारा उधळीत खंडेरायाच गणगोत भक्ती गीत Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents