-->

Header Ads

खंडोबाच्या जागरणाला दिमडी कशी वाजती भक्ती गीत Lyrics | Khandoba Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण खंडोबाच्या जागरणाला दिमडी कशी वाजती भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
__________________


खंडोबाच्या जागरणाला दिमडी कशी वाजती भक्ती गीत Lyrics


खंडोबाच्या जागरण आला दिंडी कशी वाजती..
वाघ्या संग ठेक्यावर मुरळी कशी नाचती...|| धृ ||

मल्हारी च्या दारी ही रंगत चढली भारी
भंडारा खोबऱ्यांन पिवळा झालाया मल्हारी
धाटी वाजवून अशी गिरकी बघा मारती
ए वाघ्या संग ठेक्यावर मुरळी कशी नाचती...|| १ ||

रविवारच्या रातीला तो लय हरखून गेला
खंजिरी संबळ घेऊन वाघ्या जागरणाला आला
चौरंग तो चौक मांडून मल्हारीला पूजती
ए वाघ्या संग ठेक्यावर मुरळी कशी नाचती...|| २ ||

येळकोट येळकोट जय मल्हार ही बोलती
वाकून ही कपाळांनं रुपया उचलती
मुरलीची ही मुरळी झाली देवाला त्या साजती
ए वाघ्या संग ठेक्यावर मुरळी कशी नाचती...|| ३ ||

मल्हारी मार्तंडाची ही करतेया सेवा
लंगर तोडायला देव करतोया धावा
उत्तम ह्या सर्व काही किती गाजली
ए वाघ्या संग ठेक्यावर मुरळी कशी नाचती...|| ४ ||

खंडोबाच्या जागरण आला दिंडी कशी वाजती..
वाघ्या संग ठेक्यावर मुरळी कशी नाचती...||

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇


__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण खंडोबाच्या जागरणाला दिमडी कशी वाजती भक्ती गीत Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents