अधिक मासात लय महिमा गाजते भजन Lyrics | Adhik Masat Lay Mahima Gajate
नमस्कार या पोस्टमध्ये आपण अधिक मासात लय महिमा गाजते भजन Lyrics बघणार आहोत.
__________________
🌷अधिकमासात लय महिमा गाजते भजन Lyrics 🌷
अधिक मासात लई महिमा गाजते
सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते..|| धृ ||
राई रखुमाबाई आली राधिका गवळण
राधिका गवळण आज करिते मंथन
अधिक मासात लई महिमा गाजते
सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते..|| १ ||
सावळ्या कृष्णाचे किती करीतात लाड
चोरून दही दूध त्याला देतात गोपाळ
अधिक मासात लई महिमा गाजते
सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते..|| २ ||
महिमा ऐकून मन गेले भारावून
सेवा ही खरी करा तो देईल दर्शन
अधिक मासात लई महिमा गाजते
सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते..|| ३ ||
_________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण अधिक मासात लय महिमा गाजते भजन Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment