-->

Header Ads

चिमणे चिमणे ये ग बालगीत Lyrics 🐤 Chimane Chimane Ye Ga Baalgeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण चिमणे चिमणे ये ग बालगीत Lyrics बघणार आहोत.

__________________

चिमणे चिमणे ये ग बालगीत Lyrics 🐤 Marathi


चिमणी चिमणे ये ग चिमणे ये गं
दाणे टिपून जा ग...

कावळ्या दादा येरे
गरम पोळी खा रे

आला मिठू मिठू पोपट
त्याला मिरची द्या तिखट

गाणी गाते मैना
पिते पाणी खाते दाना

सगळ्यांना दिला खाऊ
आता बाळा तुला काय देऊ

भातू भातू भातू‌...
दूध आणि भातू...‌
तूप आणि भातू‌..‌

अगडबंब हत्ती खातो
गोड गोड ऊस

सापाला आवडतो
बेडूक आणि घुस

शेळी खाते झाडांचा
कोवळा पाला लुस लुस

गाईला खायला हवा
हिरवा गार चारा..

सगळ्यांना दिला खाऊ
आता बाळा तुला काय देऊ

भातू भातू भातू‌...
दूध आणि भातू...‌
तूप आणि भातू‌..‌

भूभू कुत्रा आला
लागला बिस्किट खाऊ

आली म्याऊ म्याऊ
लागली दूध पिऊ
लाल गाजर हवा म्हणतो
पांढरा ससा...

महिला खातात पेंड
मासा खातो किडा..

सगळ्यांना दिला खाऊ
आता बाळा तुला काय देऊ

भातू भातू भातू‌...
वरण आणि भातू...‌
तूप आणि भातू‌..‌

चिमणे चिमणे ये ग
दाणे टिपून जा ग
कावळ्या दादा ये रे
गरम पोळी खा रे
सगळे सगळे यारे
बाळाला खाऊ द्या रे
भातू भातू भातू‌...
दूध आणि भातू...‌
तूप आणि भातू‌..‌
सगळे सगळे यारे
बाळाला खाऊ द्या रे

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण चिमणे चिमणे ये ग बालगीत Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents