बाण खेळतोय माझा गुरु भक्तीगीत Lyrics | Yedamai Bhaktigeet | साजन बेंद्रे
नमस्कार या पोस्टमध्ये आपण बाण खेळतोय माझा गुरु भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
सॉंग - बाण खेळतोय माझा गुरु
लिरिक्स/ सिंगर /म्युझिक - साजन बेंद्रे
म्युझिक लेबल - केशव म्युझिक
__________________
🌸बाण खेळतोय माझा गुरु भक्तीगीत Lyrics 🌸
हो येडामाईच्या पालखी पुढे ग बाई बाई
धिंगाणा झाला सुरू...
डोळ्यांना पाहिलं नवल वाटलं
म्हणाले आता काय करू ??
लय लय जबर बाण बाई खेळतोय माझा गुरु
कसं नंबर वन बाण बाई खेळतोय माझा गुरु....|| धृ ||
हे ओझरच्या ओझं गळ्यात कवड्याच्या ग माळा
गालावरती हळद भाळी कुंकवाचा टिळा
अगं कमरपट्टा अन् बाजूबंदच हलतय घुंगरू
गर्दी लय अफाट त्यात लागलं चेंगरू
लय जबर बाण बाई खेळतोय माझा गुरु..|| १ ||
हे खेळत खेळत घातलं चुन्याचं रान
ठिणग्या पडती अंगावरती नाही त्याचा भान
अग भराया लागलं वार अंग लागलं थरथरू
लय कडक बाण बाई खेळतोय माझा गुरु..|| २ ||
इरोवान गुरु माझा चालायचा वाकत
हाती बाण घेतला तेव्हा कशी येतीया ताकत
राम भाऊला बघाया गर्दी केली लोकांनी सरसरू
कसं खेळतया तुरुतुरु न
केशव साजन च शिंगरू
लय लय हटके बाण बाई खेळतोय माझा गुरु..|| ३ ||
येडामाईच्या पालखी पुढे ग बाई बाई
धिंगाणा झाला सुरू...
डोळ्यांना पाहिलं नवल वाटलं
म्हणाले आता काय करू ??
लय लय जबर बाण बाई खेळतोय माझा गुरु
कसं नंबर वन बाण बाई खेळतोय माझा गुरु....||
________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- कुठवर पाहू तुझी वाट येडू Lyrics
- येडामाय कुणाचा विश्वास तुटू देत नाही Lyrics
- नटून बसली येडामाय नागवेलीच्या पानात Lyrics
- असं वाटतं येडामाय वाऱ्या वाणी उडावं Lyrics
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण बाण खेळतोय माझा गुरु भक्तीगीत Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment