स्वामी समर्थ माझ्या हृदय मंदिरात Lyrics 🙏 Swami Samrath Majhya Hruday Mandirat
नमस्कार या पोस्टमध्ये आपण स्वामी समर्थ माझ्या हृदय मंदिरात Lyrics बघणार आहोत.
सॉंग - स्वामी समर्थ माझ्या हृदय मंदिरात
लिरिक्स - प्रसाद गाढवे
सिंगर - आदर्श शिंदे
म्युझिक - प्रसाद गाढवे
_______________________
स्वामी समर्थ माझ्या हृदय मंदिरात Lyrics
घवते कोणी अवतीभवती काळात हा घाला
तुझ्या कृपेचा स्वामीराया अनुभव मजला आला
माऊलीची चिंता जशी बाळाची नितांत
तुझी ऐकतो सद्गुरु राया माझा हा आकांत
हरलो हरलो तरी सावरलो तुझीच किमया आता
घेई उराशी या बाळाशी स्वामी समर्था...
श्री स्वामी समर्था ....
स्वामी कृपा व माझ्या वरती झालो भाग्यवंत
दयानिधी अक्कलकोटी भेटले कृपावंत
माझ्या हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ....(*३)
वेळोवेळी पडतो प्रश्न काय चुकले माझे
सुख दुखायच्या या फेऱ्यामध्ये आहेत सोबत स्वामी माझे..
घर संसाराचा भार कधी उजेड कधी अंधार
सामर्थ्य तुझे अपार माझ्या होशी तू आधार
जे जे होते जे जे होईल तूच कर्ता धर्ता
सांभाळले तूच मजला स्वामी समर्था
रंगी रंगला जीव माझा तुझ्या या नामात
स्वामी स्वामी गातो सदा स्वामी माझे गुरुदत्त..(*३)
ओढ आहे या जिवाला अक्कलकोटी जाण्याची
ओ ओ ओ.... हाक येते सदैव मजला
माझ्या स्वामी रायाची...
अपराध माझे आहे तरी कृपा स्वामींची पाहे
गहिवरचे मन माझे स्वामी आवाज देत आहे
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...(*४)
तर मन अर्पण चरणी समर्पण स्वामी मज रूप दिसले
सुमधुर शांत राम्य निवांत औदुंबर छाये बसले
ध्यान मग्न हे दिव्य प्रसन्न ज्ञानबाहू मूर्ती
विश्वाचे पालन करण्या ब्रह्मांड घेतले हाती
ब्रह्मांड घेतले हाती ...(*२)
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
बोला.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
बोला.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
|| अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज
योगीराज परब्रम्ह सचिदानंद अक्कलकोट
निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
_______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- स्वामी आहेत पाठी भक्तीगीत Lyrics
- Swami 2 Song Lyrics Marathi
- स्वामीमय झालो Song Lyrics
- आदी तूच अंती तूच सर्व ठाई Lyrics
_______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण स्वामी समर्थ माझ्या हृदय मंदिरात Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
_______________________
Post a Comment