Header Ads

स्वामी आहेत पाठी भक्तीगीत Lyrics | Swami Samarth Bhaktigeet



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये स्वामी आहेत पाठी भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.


सॉंग - स्वामी आहेत पाठी
लिरिक्स - रोहन साखरे, सागर जनार्दन
सिंगर - अभिजीत सावंत
म्युझिक - सागर जनार्दन
म्युझिक लेबल - सारेगामा इंडिया लिमिटेड


__________________

स्वामी आहेत पाठी भक्तीगीत Lyrics

सोडू नको धीर घे उभारी
ठेव विश्वास स्वामी वरी
आली जरी संकटे थांबू नको तू रं
अशक्य ही शक्य ते करी...
दुनिया ही सारी त्यांची त्यांचा हा खेळ

करतो चिंता तू कशासाठी...
करतो चिंता तू कशासाठी..
स्वामी उभे आहेत पाठी..
स्वामी उभे आहेत पाठी..
उभे आहेत पाठी..
स्वामी उभे आहेत पाठी

आभाळाची माया स्वामी ..
ब्रम्हांडनायक स्वामी..
हरल्या मनाची आस आहे स्वामी
कृपासिंधू आहे स्वामी
पंचप्राण स्वामी...
अंधाऱ्या वाटेवरी दीप आहे स्वामी
सूत्रधार या जगाचा सदा तुझ्या पाठी

करतो चिंता तू कशासाठी..
स्वामी उभे आहेत पाठी..
स्वामी उभे आहेत पाठी..
उभे आहेत पाठी..

गुरुमाऊली तू साऱ्या जगाची
दिशा देवी पावलांना पुढे चालण्याची
जीवनाचा अर्थ स्वामी समर्थ
भक्तीत आहे त्यांच्या सारे सामर्थ्य
सोडूनी दे सारे व्यर्थ विचार हे
संकटातूनी स्वामी नेई तारुनी
स्वामी विना आहे सृष्टी अधुरी ही
प्रकटली मूर्ती हो अशी कर्दळी ही
त्रिमूर्ती ही शक्ती आहे तुझ्या सोबती
उगाची भीतोसी तू कशासाठी...
उगाची भितोसी तू कशासाठी..

स्वामी उभे आहेत पाठी
स्वामी उभे आहेत पाठी
स्वामी उभे आहेत पाठी
स्वामी उभे आहेत पाठी

* * * * *
__________________


✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण स्वामी आहेत पाठी भक्तीगीत Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.