Header Ads

आदी मायेचे रूप घेतले स्वामी समर्थांनी Lyrics | Swami Samarth Song Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आदी मायेचे रूप घेतले स्वामी समर्थांनी Lyrics बघणार आहोत.

आदी मायेचे रूप घेतले स्वामी समर्थांनी Lyrics | Marathi

आदी मायेचे रूप घेतलं स्वामी समर्थांनी
अक्कलकोट वासिनी ग आई माझी
अक्कलकोट वासिनी || धृ ||

नेसूनिया हिरवी पैठणी
पिवळी चोळी दिसे शोभूनी
चंद्रकोर कुंकू लावूनी
सुवर्णमाला गळा भरुनी
करी त्रिशूल धरुनी
स्वामी दिसती दुर्गा भवानी || १ ||

सुवर्ण कमळे कानी घालूनी
नाकामध्ये शोभे नथनी
कंबरपट्टा कटी कसुनी
बाजूबंद दंडा तुनी
हिरव्या बांगड्या भरुनी
स्वामी दिसती कुलस्वामिनी || २ ||

मुकुट घालून या माथी
स्वामी दिसती सरस्वती
केस सोडूनी पाठीवरती
काली माता स्वामी दिसती
जगदंबा ती जगाची
अंबा स्वामी शक्तिरुपिणी || ३ ||

सिंहासनी बसून स्वामी
दिसे रूप महालक्ष्मी
पायी पैंजण घालूनी
स्वामी दिसे शारदा जननी
कमल सुताने दर्शन घेता
आले आनंदाश्रू नयनी || ४ ||

* * * * *




हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇



आज आपण आदी मायेचे रूप घेतले स्वामी समर्थांनी Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.