Header Ads

स्वर्ग लोकां हुनी आले हे अभंग Lyrics | Sant Tukaram Maharaj Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण स्वर्ग लोकां हुनी आले हे अभंग Lyrics बघणार आहोत. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा अभंग आहे.

स्वर्ग लोकां हुनी आले हे अभंग Lyrics | Marathi

स्वर्ग लोकां हुनी आले हे अभंग |
घडीयले सांग तुम्हा लागी || १ ||

नित्य नेमे यांसी पडता प्रतापे |
जळतील पापे जन्मांतरीची|| २ ||

तया मागे पुढे रक्षी नारायण |
मांडील्या निर्वाण उडी घाली || ३ ||

बुद्धीचा पालट नसेल कुमती |
होईल सद्भक्ती येणे पंथे || ४ ||

सदभक्ती झालिया सहज साक्षात्कार |
होईल उद्धार पूर्वजांचा || ५ ||

साधतील येणे ईहपर लोका |
सत्य सत्य भाक माझी तुम्हा || ६ ||

परोपकारासाठी सांगितले देवा |
प्रासादिक मेवा ग्रहण करा || ७ ||

येणे भवव्य व्यथा जाईल तुमची |
सख्या विठ्ठलाची आण मज || ८ ||

टाळ आणि कंठा धाडीली निशाणी |
झारे ओळखोनी सज्जन हो || ९ ||

माझे दंडवत तुम्हा सर्व लोका |
देहासहित तुका वैकुंठासी || १० ||

- संत तुकाराम महाराज




हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण स्वर्ग लोकां हुनी आले हे अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.