चालता घ्यावे हरीचे नाम भजन Lyrics | Chalata Ghyave Hariche Nam
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये चालता घ्यावे हरीचे नाम भजन Lyrics बघणार आहोत.
_________________
चालता घ्यावे हरीचे नाम भजन Lyrics
चालता घ्यावे हरीचे नाम
बोलता घ्यावे हरीचे नाम
देव भक्ताचे करीत असे काम || धृ ||
संत जनाबाईच्या घरी
दळण दळू लागे हरी
ओव्या गातोया घनश्याम
देव भक्ताचे करीत असे काम || १ ||
संत तुकारामा घरी
गाथा वाचून लागे हरी
कीर्तनी नाचत घनश्याम
देव भक्ताचे करीत असे काम || २ ||
संत सावता च्या घरी
भाजी खुडू लागे हरी
जुड्या ग बांधतो घनश्याम
देव भक्ताचे करीत असे काम || ३ ||
संत कबीराच्या घरी
शेला विनू लागे हरी
नक्षी गं काढतो घनश्याम
देव भक्ताचे करीत असे काम || ४ ||
******
_________________
_________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण चालता घ्यावे हरीचे नाम भजन Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
_________________
Post a Comment