Header Ads

जगदंबे Marathi Song Lyrics | Ajay Gogavale | सालबर्डी



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये जगदंबे Marathi Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - जगदंबे
मूव्ही - सालबर्डी
लिरिक्स - मुकुंद भालेराव
सिंगर - अजय गोगावले
म्युझिक - पद्मनाभ गायकवाड


__________________

जगदंबे Marathi Song Lyrics

अंधार मातला थोर असा घनघोर
लागला घोर ग जगदंबे....
जोडूनी मायेचा दोर.. याव समोर
व्याकुळ पोर ग जगदंबे..
उदो उदो उदो उदो..

काळजाला काळा का भिन्न राकुस
एक आसरा बाळा तुझीच ग कूस
दाट मनात कल्लोळ..
तूच माऊली संभाळ
ज्योत तुझी ग तेजाळ..
लख्ख होऊ दे आभाळ..
आई उदे ग.. तू होऊ दे ग..

जागर तुझाच आता गोंधळ..अंबे
काळरातीचा जोर वाढला घोर
होई शिरजोर गं जगदंबे...
अंधार मातला थोर असा घनघोर
लागला घोर ग जगदंबे....

भव मायेची अवस दाटली
तुझं हरवलं बाळ...
भव मायेची अवस दाटली
तुझं हरवलं बाळ...
आता तूच सांभाळ..

उंबऱ्यात बैसला टपून.. 
दैत्य कुणी नाठाळ...
उंबऱ्यात बैसला टपून.. 
दैत्य कुणी नाठाळ...
अग उजेड होई पतुर

अंबे तोडू नको ग नाळ..
आई तुझं हरवलं बाळ..
आता तूच सांभाळ करी ग..
धुलितांचा संहार करी गं
पती त्यांचा उद्धार करी ग..
आर पार संचार करी..
त्रिशूल ते घेऊनी करी
वारंवार ती वार करी
तमासुराला ठार करी..
इतके ग उपकार करी..

हे तुळजापूर वासिनी..
भवानी तुझाच ह्ये गोंधळ
वाजू दे अंतरात आई
तुझाच गंध संबळ..

माहूरगड वासिनी रेणुका ये ग सत्वर
भाव निद्रेतून जागून आई
होऊ दे जागर..

कोल्हापुरी चे महालक्ष्मी
शमवी कोलाहल
तुझ्या कृपेने संसाराचं प्राशन हलाहल...

वनी गडाची सप्तशृंगी
तू यावं गोंधळाला
हा हा हा हा हा..

वनी गडाची सप्तशृंगी तु यावं गोंधळाला
सात हातांनी आण खेचूनी
आई तुझ्या बाळाला...

दाट मनात कल्लोळ
तूच माऊली सांभाळ
ज्योत तुझी ग तुझी ग तेजाळ
लख्ख होऊ दे आभाळ

आई उदे ग तू होऊ दे ग..
जागर तुझाच आता गोंधळ अंबे

काळरातीचा जोर ...
अंधार मातला थोर...
काळरातीचा जोर ...
अंधार मातला थोर...
असा घनघोर...
लागला घोर ग जगदंबे

* * * * *
__________________


✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण जगदंबे Marathi Song Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.