Header Ads

देवा येतो मी पंढरीला Lyrics | Deva Yeto Mi Pandhrila Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण देवा येतो मी पंढरीला Lyrics बघणार आहोत.

___________________

🌷देवा येतो मी पंढरीला Lyrics🌷

रखुमाईच्या तू विठ्ठला....
देवा येतो मी दर्शनाला...
देवा येतो मी दर्शनाला.
ओढ लागली माझे मनाला..
देवा येते मी पंढरीला
ओढ लागली माझे मनाला..
देवा येतो मी पंढरीला ..|| धृ ||

माझे ज्ञानोबा माऊलीने केली 
वारीला ही सुरुवात
तुकोबाचे अभंग गाथा भक्त पायी चालत
साधुसंतांचा जमला मेळा
ओढ लागली माझे मनाला..
देवा येते मी पंढरीला
ओढ लागली माझे मनाला..
देवा येतो मी पंढरीला ..|| १ ||

उघडा पंढरपूर आला तिथे पुंडलिक भेटला
आई बापाची सेवा करी उभा विटेवरी राहिला
चंद्रभागेचा आंघोळीला..
ओढ लागली माझे मनाला..
देवा येते मी पंढरीला
ओढ लागली माझे मनाला..
देवा येतो मी पंढरीला ..|| २ ||

संत नामदेवाच्या घरी जनी दळण दळीत
तिच्या हातात शेन गवऱ्यात विठ्ठल विठ्ठल बोलत
चिंता तिची हो विठ्ठलाला..
ओढ लागली माझे मनाला..
देवा येते मी पंढरीला
ओढ लागली माझे मनाला..
देवा येतो मी पंढरीला ..|| ३ ||

तुकाराम मी ज्ञानेश्वर वारकरी करती गजर
तुलसी वृंदावन डोईवर नाद घुमतो गगनावर
देवा येते तुझ्या वारीला..
देवा येतो तुझ्या वारीला..
ओढ लागली माझे मनाला..
देवा येते मी पंढरीला
ओढ लागली माझे मनाला..
देवा येतो मी पंढरीला ..|| ४ ||

किती येते हो साधू संत चंद्रभागेचा भरला घाट
कशी राहू रे मी घरात धरली त पंढरीची ती वाट
वासुदेव विनवी तुला..
ओढ लागली माझे मनाला..
देवा येते मी पंढरीला
ओढ लागली माझे मनाला..
देवा येतो मी पंढरीला ..|| ५ ||

* * * * * *
___________________


✅ही भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण देवा येतो मी पंढरीला Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.