भोळ्या गिरीजा वराला ध्या रे प्रिय शंकराला Lyrics | Bholya Girija Varala Dhya Re Priya Shankarala
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण भोळ्या गिरीजा वराला ध्या रे प्रिय शंकराला Lyrics बघणार आहोत.
_______________
भोळ्या गिरीजा वराला ध्या रे प्रिय शंकराला Lyrics
भोळ्या गिरीजा वराला |
ध्या रे प्रिय शंकराला || धृ ||
व्याघ्रासण भूषण कटिबंधी
सदा अखंडित राही समाधी
अंगी भस्म लावलेला
ध्या रे प्रिय शंकराला || १ ||
वाजत भम भम डमरू भेरी
नाचती भूत पिशाच्चे सारी
भाळी चंद्र लावलेला
ध्या रे प्रिय शंकराला || २ ||
नंदी स्वार अखंडित राहे
झुळझुळ गंगा मस्तकी वाहे
शोभे निळकंठ ज्याला
ध्या रे प्रिय शंकराला || ३ ||
मस्त सदा ध्यानी रत डोले
वदनी राम राम पद बोले
तुकड्या वदीतो पदाला
ध्या रे प्रिय शंकराला || ४ ||
* * * * *
_______________
✅ही भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
_______________
Post a Comment