-->

Header Ads

मराठी महिन्याचे गाणे Lyrics✨👶 मराठी बालगीत



नमस्कार या पोस्टमध्ये आपण मराठी महिन्याचे गाणे Lyrics बघणार आहोत.

_______________

📆 मराठी महिन्याचे गाणे Lyrics 📅


चैत्र महिना येतो पहिला
गुढी उभारू स्वागताला

वैशाख महिना खूप उन्हाचा
तापलेल्या सूर्याचा...

ज्येष्ठ महिन्यात पाऊस येई
आनंदाचे गाणे गाई..

आषाढ विठुराया मध्ये दंग
सगळे मिळून गाते अभंग !!

श्रावणात सजला निसर्ग सगळा
सनावारांचा असे सोहळा

भाद्रपदात बाप्पा येती
मिळून सगळे करू आरती

अश्विन मध्ये दसरा दिवाळी
लांबच लांब दिव्यांच्या ओळी

कार्तिक महिन्यात पौर्णिमा त्रिपुरी
दिव्यांची आरास घरोघरी

मार्गशीषात येई थंडी
घाला स्वेटर कानटोपी बंडी

पौष महिना संस्कृतीचा
तिळगुळ देण्याघेण्याचा

माघ हसवतो निसर्गाला
नवी पालवी येई झाडाला

फाल्गुन महिन्यात सण होळीचा
गोड गोड पुरणाच्या पोळीचा...

असे हे बारा महिने मराठी
निसर्ग सोबत बदलत राहती

जनावरांची गुंफण घालू
निसर्ग जपूनी साजरा करू..
निसर्ग जपूनी साजरा करू..

* * * * *
_______________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

_______________

आज या पोस्टमध्ये आपण मराठी महिन्याचे गाणे Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!


_______________






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.