Header Ads

मैत्री असावी अशी बालगीत Lyrics 💛💛Baalgeet Marathi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण मैत्री असावी अशी बालगीत Lyrics बघणार आहोत.

________________

😍मैत्री असावी अशी बालगीत Lyrics 👯


तळ्यात जवळ राहायचे तीन खास दोस्त...
बेडूक, चतुर, गोगलगाय..
खेळायचे रोज मस्त....

एके दिवशी पडून गेला पाऊस मुसळधार
धबधब्याच्या कल्पनेनेच खुश झाले फार
ढगाळ आकाश गार हवा सगळं होतं भारी
तयार होऊन निघाली तिघांची सवारी
बेडूक निघाला उड्या मारत..
चतुर लागला उडू..
काळुबाई गोगलगाय लागली मागे पडू..

पोहोचणार कसे वेळेत तिथे
करावे तरी काय ?
इकडे तिकडे फिरत तिघे शोधू लागले उपाय

तेवढ्यात चतुराला दिसली एक पोकळ फांदी
बेडूक म्हणालं - डराव ! याची बनवू ढकल गाडी

घट्ट पकडून फांदीला
गोगलगाय बसली आत..
बेडूक चतुर च्या सोबतीने
गाडी निघाली जोरात...

बघता बघता तिघे पोहोचले धबधब्यापाशी !
एकमेकांना साथ देणारी मैत्री असावी अशी !

________________


✅ही भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇

________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण मैत्री असावी अशी बालगीत Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.