Header Ads

आजोबांची मिशी बालगीत Lyrics | Ajobanchi Mishi Marathi Baalgeet


नमस्कार या पोस्टमध्ये आपण आजोबांची मिशी बालगीत Lyrics बघणार आहोत.

___________________

👴आजोबांची मिशी बालगीत Lyrics 👴

आजोबांची मिशी..
भारी दिसते कशी..😍😍
येईल का मलाही
अगदीच तशी...
आजोबांची मिशी..
भारी दिसते कशी...😍😍

पुठ्ठ्यावर रंगवून
पाहू का अशी..😉😉
बाहुलीची वेणी
दिसेल का जशी..💃💃
आजोबांची मिशी..
भारी दिसते कशी...😍😍
कणसाच्या केसांची 🌽🌽
जुडी करू अशी...
नारळाची शेंडी 🌾
दिसेल का जशी...
आजोबांची मिशी..
भारी दिसते कशी...😍😍

कापसाची गुंडी 💨
चालेल का अशी..
रेशमाची लडी ⛒
दिसेल का जशी..
आजोबांची मिशी..
भारी दिसते कशी...😍😍

गवताची दाढी 🌿
पकडू का अशी..
लावूया का माऊची
शेपटीच अशी..🐱🐈
आजोबांची मिशी..
भारी दिसते कशी...😍😍

* * * * *
_________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________


👀आज या पोस्टमध्ये आपण आजोबांची मिशी बालगीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.