Header Ads

मुंगीबाई मुंगीबाई बालगीत Lyrics | Mungibai Mungibai Baalgeet



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण मुंगीबाई मुंगीबाई बालगीत Lyrics बघणार आहोत.

____________________

🐜मुंगीबाई मुंगीबाई बालगीत Lyrics🐜

मुंगी बाय मुंगी बाय
मुंगी बाय मुंगी बाय
जाता कुठे असता कुठे
आणि खरंतर नसता कुठे
जाता कुठे असता कुठे
आणि खरंतर नसता कुठे

इकडून तिकडे नेता काय
खाता काय पिता काय. .
मुंगी बाई मुंगी बई
मुंगी बाई मुंगी बई

दारे खिडक्यांच्या खिंडी
पूर्जा सम तांब्या भांडी
दारे खिडक्यांच्या खिंडी
पूर्जा सम तांब्या भांडी
त्यांच्या मागून या सरकत
रांग उतरते बघा घसरत
कसे समजते मुंगी बाई
कुणी ठेवले कोठे काय ?

कोठे साखर कोठे रवा
कुठे मिठाई कुठे खवा
कुठे कणिक अनु भात कुठे
कुठे जाम अन केक कुठे
चॉकलेटही पापलेट ही
जे सांडे संपून जाई...
मुंगी बाई मुंगी बाई
मुंगी बाई मुंगी बाई

काय काय हे करशी काय
पळण्या वाचून उपाय काय
काय काय हे करशी काय
पळण्या वाचून उपाय काय
कधी न थांबे माझा पाय
अनु बोलाया वेळच नाय
रांगेमध्ये जन्म भरी 
मुळीच ना आम्ही दिन करी
जन्म थोडका काम अफाट
म्हणून अविरत चालू वाट
कामाचे हे आम्हा पिसे
कामामध्ये राम दिसे

जग हे जरी मुंगी म्हणते 
हत्तीला मी लोळवते
अजून बोलणे गरजच नाय..
मुंगी बाई मुंगी बाई
मुंगी बाई मुंगी बाई

* * * * * *
___________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

____________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण मुंगीबाई मुंगीबाई बालगीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबददल खूप खूप खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!
____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.