संसारात सुख नाही हुशारी धर Lyrics | Marathi Bhajn
नमस्कार या पोस्टमध्ये आपण संसारात सुख नाही हुशारी धर Lyrics बघणार आहोत.
_____________________
🌹संसारात सुख नाही हुशारी धर Lyrics 🌹
संसारात सुख नाही हुशारी धर...
कोणाचे गणगोत कोणाचं घर...|| धृ||
सर्व म्हणती माझं माझं मीच आहे करता
चुटकी मध्ये निघून जाशील कुणी नाही धरता
जसे घडले हातून कर्म केले तसे भर
कोणाचे गणगोत कोणाचं घर...|| १||
कोणाचे आईबाप कुत्र मित्र पत्नी
कोणाचे नाव गाव कुणी नाही वर्तनी
मोठे मोठे घसरून गेले थरावरी थर
कोणाचे गणगोत कोणाचं घर...|| २ ||
कोणाचा चुलता काका कोणाचा मामा
बायकोचे गणगोत काही नाही कामा
स्वार्थापोटी माया सारी धरीवर धर
कोणाचे गणगोत कोणाचं घर...|| ३ ||
धनसंपदा जवळ आहे जमले का सारे
संकटाची वेळ आली उरावर मारे
साथी तुझा कोणी नाही एकटा तू मर
कोणाचे गणगोत कोणाचं घर...|| ४ ||
रूप जरी अमर झाले तुला झाला भ्रम
सद्गुरुचे पाय धर सत्य कळेल मर्म
दुनिया दास सांगे अभ्यास चिकाटीने कर
कोणाचे गणगोत कोणाचं घर...|| ५ ||
संसारात सुख नाही हुशारी धर...
कोणाचे गणगोत कोणाचं घर...||
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया Lyrics
- सोडून जाऊ नको रे विठ्ठला Lyrics
- प्रेम हरीच्या बाई हृदयात दाटलं Lyrics
_____________________
आज या पोस्टमध्ये आपण संसारात सुख नाही हुशारी धर Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
_____________________
Post a Comment