मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया Lyrics | Milnar Nahi Punha Aai Bapachi Maya
🙏🙏🙏 नमस्कार या पोस्ट मध्ये आपण मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया Lyrics बघणार आहोत.
________________________
🍁मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया Lyrics | Marathi🍁
विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया |
काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या||
मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया..... || धृ ||
तुज मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार गाडी |
आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी ||
म्हातारपणीच्या आई बापाला लावशील मिटवा काया |
मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया... || १ ||
तुला मिळतील बायका पोरगं गोत्र मित्र परिवार |
स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार ||
जीवना मधली अमोल संधी नको घालू वाया |
मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया.. || २ ||
आई बाप जिवंत असतानाही केली तू सेवा |
ते मेल्यावरती कशाला तू म्हणतोस देवा देवा ||
बुंदी लाडूच्या पंगती बसवती नंतर तू जेवाया |
मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया... || ३ ||
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी |
तू समजून समजून वेड्या रे होऊ नकोस अवचारी ||
सोपानाचे बोल ध्यानी घे अज्ञान हे वर काया |
मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया.. || ४ ||
* * * * * * *
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले Lyrics
- नाशवंत हा देह मानवा जाईल धरती खाली Lyrics
- आई नाही बाप नाही आधार दे ना कोणी Lyrics
_______________________
📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबददल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!!!
_______________________
Post a Comment