पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले Lyrics | Pundalikane Kay Kele AaiBap Rabvile
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले Lyrics बघणार आहोत.
________________________________
👵पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले Lyrics👴
पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले
आपण झाला कारभारी बाप ठेवला चाकरी || धृ ||
आपण खाये दूध भात बाप पाहून धूतला हात
पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले...|| १ ||
आपण नेसे जरी पाटी बापा लावी लंगोटी
पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले...|| २ ||
बायको खाये दूध पेढे माय तुकड्यासाठी रडे
पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले...|| ३ ||
बायको घेतली खांद्यावरी मायच्या गळ्यात लावली दोरी
पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले...|| ४ ||
तुका म्हणे ऐसा पुत्र जीता घालावे मातीत
पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले...|| ५ ||
☘ ☘ ☘ ☘ ☘ ☘
_____________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे Lyrics
- भक्तीची वाट आम्हा संतांनी दावली Lyrics
- मन माझे रंगले भजनात Lyrics
- पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग Lyrics
________________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण पुंडलिकाने काय केले आईबाप राबविले Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
________________________________
Post a Comment