Header Ads

माय पित्याच्या सेवेमधूनी कसा उठू मी सांग रे Lyrics 👦👧May Pityachya Sevemadhuni Kasa Uthu Mi Sang Re



नमस्कार या पोस्टमध्ये आपण माय पित्याच्या सेवेमधूनी कसा उठू मी सांग रे Lyrics बघणार आहोत.

_______________

🌺माय पित्याच्या सेवेमधूनी कसा उठू मी सांग रे Lyrics 🌺

माय पित्याच्या सेवेमधूनी
कसा उठू मी सांग रे
विटेवरी थांब देवा विटेवरी थांब...|| धृ ||

हा पुंडलिक ना ढळला
कधी सोडून त्यांची सेवा
हे त्रिवार राहील सत्य
घ्या जाणून तुम्ही ही सेवा
अरे माय पित्याची सेवा अधुरी
कसा सोडू मी सांग रे..
विटेवरी थांब देवा विटेवरी थांब...|| १ ||

हा भक्त लाडका तुमचा
मजवरी करावी कृपा
तुम्ही जगताचे कृपाळू
मज तारी मायबापा
दर्शन तुमचे घडल्या वरती
फिटेल माझे पांग रे
विटेवरी थांब देवा विटेवरी थांब...|| २ ||

मी पामर आज मुखाने
काय वर्णू तो सोहळा
आषाढी कार्तिकीच्या
भक्तजन होती गोळा
दर्शन घेण्या उभी ठाकले
भक्तजनांची रांगरे
विटेवरी थांब देवा विटेवरी थांब...|| ३ ||

* * * * * *
_________________


ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________


आज या पोस्टमध्ये आपण माय पित्याच्या सेवेमधूनी कसा उठू मी सांग रे Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.