लखाबाई झुरतो मी माझ्या मनाला Lyrics | Lakhabai Jhurato Mi Majhya Manala
नमस्कार या पोस्टमध्ये आपण लखाबाई झुरतो मी माझ्या मनाला Lyrics बघणार आहोत.
सॉंग - लखाबाई झुरतो मी माझ्या मनाला
सिंगर/लिरिक्स/ म्युझिक - सोनू साठे
म्युझिक लेबल - विशाल साठे ऑफिशियल
_________________
🌸लखाबाई झुरतो मी माझ्या मनाला Lyrics 🌸
(चाडीला माडी करूनी जगणाऱ्या
माणसाचं करावं तरी काय
पण सत्याचा उलगडा करणारी
तू माझी वरखेडची लखाबाय....)
त्रास हा मला ग काय सांगू तुला ग
जीव लावून मी आता कुणाला
ग लखाबाय झुरतो मी माझ्या मनाला ..
झुरतो मी माझ्या मनाला लखाबाय...|| धृ ||
निर्मळ मनामध्ये नाही कसली खोटं
तरीसुद्धा दुनिया दाखविते बोट
लखाबाई तु ग मला दाखविली वाट
भक्ती करून मि ग भरतो माझ पोट..
म्हणून आपलं मी साऱ्या जपलं मी
धोका दिला मला क्षणोक्षणाला...
ग लखाबाय झुरतो मी माझ्या मनाला ..|| १ ||
असा कसा लखाबाई तुझा ग डाव
खऱ्याला किंमत नाही खोट्याला वाव
हे आई... सांगावं तूच मला कसं जगावं..
चांगलं वागून दुनिया ठेवतीया नाव..
का दिल्या वाटा ग नफा नाही तोटा ग..
गेले विसरून केलेल्या ऋणाला..
ग लखाबाय झुरतो मी माझ्या मनाला ..|| २ ||
दुःखाचा डोंगर माझ्या ग उशाला
वरवरचं गणगोत मला ग कशाला ?
हे लावणार नाही पुन्हा चंदना आशाला
उत्तर देईन आता जशाशी तशाला..
नको कुणी जवळ ग तूच घाल कवळ ग
सोनू बाळाला ना कुठल्या धनाला...
ग लखाबाय झुरतो मी माझ्या मनाला ..|| ३ ||
त्रास हा मला ग काय सांगू तुला ग
जीव लावून मी आता कुणाला
ग लखाबाय झुरतो मी माझ्या मनाला ..
झुरतो मी माझ्या मनाला लखाबाय...||
* * * * *
___________________
✔ ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________
👀आज या पोस्टमध्ये आपण लखाबाई झुरतो मी माझ्या मनाला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
___________________
Post a Comment