Header Ads

झोपडीमध्ये माझ्या तू आई आली आनंदान Lyrics | Lakhabai Song Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण झोपडीमध्ये माझ्या तू आई आली आनंदान Lyrics बघणार आहोत.


सॉंग - झोपडीमध्ये माझ्या तू आई आली आनंदान
लिरिक्स/म्युझिक/सिंगर - सोनू साठे


______________________


仚 झोपडीमध्ये माझ्या तू आई आली आनंदान Lyrics 仚

हे झोपडीमध्ये माझ्या तू माय आली आनंदानं
गरिबांची लखाबाई राखलीस जान....|| धृ ||

आतुरतेने पाहत होतो आई तुझी वाट..
तुझ्या येणाऱ्या झाली आनंदी पहाट....
हे पंचपकवानाचं नाही माझ्या घरी ताट...
भक्तीत माझ्या आई नाही कसली खोटं
सेवा साधी भोळी केली कल्पना ना..
गरिबांची लखाबाई राखलीस जान....|| १ ||

तुझ्या विना नाही मला आधार कुणाचा ...
पांग कसं फेडू आई तुझ्या या ऋणाचा...
हो नाही विचार केला कधी पैशाचा धनाचा
तुझ्या नामात समाधानी मी मनाचा
सारं मला मिळालया पूर्व पुण्याईन...
गरिबांची लखाबाई राखलीस जान....|| २ ||

आशीर्वाद सदा आई तुझा शिरी रहावा...
मरणाच्या वेळी फक्त नाव तुझं घ्यावं..
अंतरी मनाला आई मोक्ष मिळावा..
तुझ्या साक्षीनं देह चंदनाचा व्हावा...
सोनू ची झोळी आई भरली तू सुखान
गरिबांची लखाबाई राखलीस जान....|| ३ ||

झोपडीमध्ये माझ्या तू माय आली आनंदानं
गरिबांची लखाबाई राखलीस जान....||

* * * * *
______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

______________________


👀आज या पोस्टमध्ये आपण झोपडीमध्ये माझ्या तू आई आली आनंदान Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.