कसा चमकतोय झुंबर लखाबाईच्या रावळात Lyrics | Kasa Chamaktoy Jhumbar Lakhabaichya Ravlat
नमस्कार या पोस्टमध्ये आपण कसा चमकतोय झुंबर लखाबाईच्या रावळात Lyrics बघणार आहोत.
___________________
🌸कसा चमकतोय झुंबर लखाबाईच्या रावळात Lyrics 🌸
सूर्यनारायण पाहून मुखडा चाललाय मावळत
अन् कसं बाई चमकतोय..
अन् कसं बाई चमकतोय..
अन् कसं बाई चमकतोय..
झुंबर लखाबाईचा रावळात..|| धृ ||
हे लाजरी मूर्ती कशी दिसते या खुलून
पाहताच विष्णु देव गेलेया भूलून
पौर्णिमेचा चंद्र कसा आलया निवळत
अन् कसं बाई चमकतोय..
झुंबर लखाबाईचा रावळात..|| १ ||
हे आई तुझ्या मंदिरात लय होतो थाटमाट
गंगेचा येतो तुझ्या चरण्यावर लोट
शेंदूराचा टिळा न भांग मोती पावळात
अन् कसं बाई चमकतोय..
झुंबर लखाबाईचा रावळात..|| २ ||
ए..तुझ्यामुळे झालं आई वरखेड महान
कोण्या राजाने तुझं बांधलया ठाणं
शिवकालीला घेऊन सोनू आरती ओवाळतो
अन् कसं बाई चमकतोय.. झुंबर लखाबाईचा रावळात..|| ३ ||
सूर्यनारायण पाहून मुखडा चाललाय मावळत
अन् कसं बाई चमकतोय..
अन् कसं बाई चमकतोय..
अन् कसं बाई चमकतोय..
झुंबर लखाबाईचा रावळात..||
* * * * *
______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मी अन माझी लखाबाय Lyrics
- लखाबाई लिंबाच्या खोडाला Lyrics
- आसूड बडवित आली लखाबाई Lyrics
- लखाबाईची पालखी निघाली Lyrics
______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण कसा चमकतोय झुंबर लखाबाईच्या रावळात Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
______________________
Post a Comment