Header Ads

महारुद्र शिवराय Marathi Song Lyrics | महारुद्र शिवराय | अवधूत गांधी अमित घूगरी



नमस्कार या पोस्टमध्ये आपण महारुद्र शिवराय Marathi Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - महारुद्र शिवराय
लिरिक्स - दीग्पाल लांजेकर
सिंगर - अवधूत गांधी अमित घूगरी
म्युझिक - अवधूत गांधी, मयूर राऊत
म्युझिक लेबल - पनोरमा म्युझिक


________________________

🌻महारुद्र शिवराय Marathi Song Lyrics🌻

महारुद्र शिवराय.. शिवरुद्र शिवराय
शक्तीरुद्र शिवराय.. शिवराय हे..
महाकाल शिवराय.. संहारक शिवराय ग
रणपती जगपती शिवराय हे..

धगधगत्या रानात झुंज तांडव
प्रलयाचे गाणं गाती रुद्र भैरव
रक्ताचा नैवेद्य हे महादेव
रणपती शिवराय त्याचेच नाव...
राजगडी वस्तीचे करती सदैव
दुर्गावती शिवराय देवाधिदेव
मराठी आम्ही हे गणगोत त्यांचे
भयंकर महारुद्र शिवराय हे..

महारुद्र शिवराय शिवरुद्र शिवराय
शक्तीरुद्र शिवराय.. शिवराय हे..
महाकाल शिवराय.. संहारक शिवराय ग
रणपती जगपती शिवराय हे.

सह्याद्रीला जिंकले कोकण हे जिंकले
समिद्राला जिंकले शत्रू सारे नमवले
त्यास त्याने ठेचले पाची बादशाह ठोकले
गरिवांना रोकले...

ज्वालामुखी शिवराय.. वादळ शिवराय..
झंझवात शिवराय.. शिवराय हे....
धरणी कंप शिवराय.. महापूर शिवराय..

धगधगता अंगार शिवराय हे...
दुष्टांना भीतीही त्यांची वाटते
दुर्दम्य लढवय्या शिवराय हे..
विजेपरी न्याय धारदार ज्यांचा....
महापराक्रमी शिवराय हे

माता-पिता बंधू शिवराय हे
सखा प्राण दाता शिवराय हे..
संसारा आधार शिवराया हे..
स्वराज्य सर्वस्व शिवराय हे..
शिवराया रुद्र रूप शिवराय
डमरूचा डंकार शिवराय हे

सुदर्शन शिवराया वज्र रूप शिवराय
महाध्वनी शंख नादी शिवराय हे
दुर्गेची ती कट्यार बुद्धी रूप शिवराय
हनुमंताची गदा शक्ति रूप शिवराय..
कालिकेचे नृत्य भैरवाची कृत्य...
झुंजार अजिंक्य शिवराय हे...

महारुद्र शिवराय.. शिवरुद्र शिवराय
शक्तीरुद्र शिवराय.. शिवराय हे..
महाकाल शिवराय.. संहारक शिवराय ग
रणपती जगपती शिवराय हे..

* * * * * *
________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण महारुद्र शिवराय Marathi Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!
________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.