Header Ads

भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा Lyrics | # महाशिवरात्री भजन



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा Lyrics बघणार आहोत.

___________________

🌼भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा Lyrics 🌼

हेचि मागणे देवा शिरी हात ठेवा
भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा.. || धृ ||

देवा हो दयाळा दयाळा कृपाळा
नाव उच्चारीन तुझे वेळोवेळा
तुझ्या सेवेचा मज गोड मिळो मेवा
भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा.. || 1 ||

अभिलाषा मोठी दान देई ओटी
आवडी धरूनी तुझे नाम कंठी
खचल्या जीवाला विसावा मिळावा
भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा.. || 2 ||

शिव भगवंता गोड तुझी गाथा
चरणावरी देवा ठेवीतो माथा
दृष्टीस माझ्या तूच तू दिसावा
भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा.. || 3 ||

हेचि मागणे देवा शिरी हात ठेवा
भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा.. ||

* * * * * *
___________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.