घंटा मंदिरी वाजला खणखण Lyrics | Ghanta Mandiri Vajala Khan Khan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण घंटा मंदिरी वाजला खणखण Lyrics बघणार आहोत.
____________________________________
घंटा मंदिरी वाजला खणखण Lyrics
घंटा मंदिरी वाजला खणखण
महादेवाला बेल मी वाहिन
शंभू देवाला बेल मी वाहिन || धृ ||
दर्शन घेतलं पायरीच
फुल मी वाहिन जाईच
घंटा मंदिरी वाजला खणखण ..|| १ ||
दर्शन घेतल्यानंतर
फुल मी वाहिल झेंडूच
घंटा मंदिरी वाजला खणखण ..|| २ ||
दर्शन घेतलं पिंडीचा
नारळ मी वाहिल शेंडीच
घंटा मंदिरी वाजला खणखण ..|| ३ ||
दर्शन घेतलं पार्वतीचं
हळदी कुंकू मानाच
घंटा मंदिरी वाजला खणखण ..|| ४ ||
प्रदक्षिणा घातली मंदिराला
सौभाग्य मागते देवाला
घंटा मंदिरी वाजला खणखण ..|| ५ ||
महादेवाला घालते पाणी
मुखी गाऊ दे तुझी गाणी
घंटा मंदिरी वाजला खणखण ..|| ६ ||
महादेवाला घालते दूध
सदैव राहू दे नामात धुंद
घंटा मंदिरी वाजला खणखण ..|| ७ ||
महादेवाला लावते भस्म
सर्वांची दुःख कर नष्ट
घंटा मंदिरी वाजला खणखण ..|| ८ ||
* * * * * * *
____________________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
____________________________
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
____________________________________
Post a Comment