रुक्मिणीने हट्ट धरिला Lyrics | Rukminine Hatta Dharila
नमस्कार या पोस्टमध्ये आपण रुक्मिणीने हट्ट धरीला Lyrics बघणार आहोत.
_______________________________
रुक्मिणीने हट्ट धरीला Lyrics
रुक्मिणीने हट्ट धरिला हो देवा पांडुरंगा
किती करी येर झारा भक्तांचा संग सोडा || धृ ||
पांडुरंग मने रुक्मिणी नको अडवू माझी वाट
आलेत साधु संत करतील राऊळी बोभाट
रुक्मिणीने हट्ट धरिला हो देवा पांडुरंगा.. || १ ||
पांडुरंग म्हणे रुक्मिणी धरू नको माझा हात
आलेत माझ्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर एकनाथ
रुक्मिणीने हट्ट धरिला हो देवा पांडुरंगा...|| २ ||
पांडुरंग म्हणे रुक्मिणी
नको करू गुजगोष्टी
आला असेल नामा मंदिरी
बोलवेल भजनासाठी
रुक्मिणीने हट्ट धरिला हो देवा पांडुरंगा..|| ३ ||
पांडुरंग म्हणे रुक्मिणी नको ओढू माझा शेला
आली असेल ज्यांनी मंदिरी तुळशीहार वाहण्या गळा
रुक्मिणीने हट्ट धरिला हो देवा पांडुरंगा...|| ४ ||
पांडुरंग म्हणे रुक्मिणी सोड सोड हा हट्ट
भक्त आपली लेकरे आपण त्यांचे मायबाप
रुक्मिणीने हट्ट धरिला हो देवा पांडुरंगा...||५ ||
* * * * * *
_______________________________
- विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics
- जरा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा Lyrics
- मोजता येत नाही जगाच्या मापन Lyrics
_______________________________
आज या पोस्टमध्ये आपण रुक्मिणीने हट्ट धरीला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
_______________________________
Post a Comment