Header Ads

हिरवं हिरवं बेल ताज वाहते मी तुला महादेवा Lyrics💛💛 # महाशिवरात्री भजन



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण हिरवं हिरवं बेल ताज वाहते मी तुला महादेवा Lyrics बघणार आहोत.
__________________

🍁हिरवं हिरवं बेल ताज वाहते मी तुला महादेवा Lyrics🍁

हिरवं हिरवं बेल ताज वाहते मी तुला
अरे महादेवा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे... || धृ ||

या महाशिवरात्रीत गार वाराही सुटला
वारा ही सुटला शंभू पार्वतीला भेटला
संगे घेऊन नंदीला हा फेरा चुकू दे
एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे... || 1 ||

आज घरोघरी साऱ्या जमल्या या नारी
बेलही वाहतात या महाशिवरात्रीत
महाशिवरात्रीचा उपास करूनी मोक्षपदाला ने
एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे... || 2 ||

तू दीनाचा रे नाथ तुझी पाहते मी वाट
या सुखी जीवनात आहे तुझीच रे साथ
भजन तुझे गाण्यासाठी हर्ष मनाला दे
एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे... || 3 ||

* * * * * *
__________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀आज आपण हिरवं हिरवं बेल ताज वाहते मी तुला महादेवा Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.