रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी Lyrics | Rukmini Rani Dete Gangech Pani
नमस्कार या पोस्टमध्ये आपण रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी Lyrics बघणार आहोत.
_______________________________
✨रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी Lyrics✨
रुक्मिणी राणी देते गंगेचे पाणी पाणी निर्मळ..
उठा ना देवा सकाळ झाली करा ना आंघोळ..|| धृ ||
झाडला वाडा टाकला सडा
आली रांगोळी काढून
उठा ना देवा सकाळ झाली
करा ना आंघोळ..|| १ ||
सोन्याचा गंगाळ चांदीचा पाट
पाणी टाकते तांब्यानं
उठा ना देवा सकाळ झाली
करा ना आंघोळ..|| २ ||
पिवळा पितांबर जरीचा शेला
लाल फेटा ग बांधून
उठा ना देवा सकाळ झाली
करा ना आंघोळ..|| ३ ||
उगाळलं चंदन लावा ते गंध
बुक्का तो प्रेमळ
उठा ना देवा सकाळ झाली
करा ना आंघोळ..|| ४ ||
अंगणी नारायण वासुदेव आला
तू काय गातोया अभंग
उठा ना देवा सकाळ झाली
करा ना आंघोळ..|| ५ ||
★ ★ ★ ★ ★
_______________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 📄👇👇👇
- रुक्मिणीने हट्ट धरिला Lyrics
- दळण कांडण बाई मी करिते जोमान Lyrics
- जन्मोजन्मीचा भिकारी देवा आलो तुझ्या दारी Lyrics
- भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics
_______________________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤!!!!🙏🙏🙏🙏
_______________________________
Post a Comment