दळण कांडण बाई मी करिते जोमान Lyrics | Dalan Kandan Bai Mi Karite Joman
नमस्कार या पोस्टमध्ये आपण दळण कांडण बाई मी करिते जोमान Lyrics बघणार आहोत.
________________________________
दळण कांडण बाई मी करिते जोमान Lyrics
दळण कांडण बाई मी करिते जोमान
करिते जोमान विठुरायाच्या नामानं || धृ ||
सकाळी उठून बाई मी टाकते सडा
माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा
दळण कांडण बाई मी करिते जोमान... || १ ||
सकाळी उठून मी टाकते रांगोळी
चंद्रभागेच्या पाण्याची विठुरायाची आंघोळ
दळण कांडण बाई मी करिते जोमान .. || २ ||
माझ्या अंगणात बाई तुळशीचे रोप
विठ्ठलाच्या कपाळी लावा चंदनाचा लेप
दळण कांडण बाई मी करिते जोमान .. || ३ ||
रुक्मिणी माझी गोरी माझा विठ्ठल सावळा
देवाला नेसविला पितांबर बाई पिवळा
दळण कांडण बाई मी करिते जोमान ..|| ४ ||
विठ्ठल हरी राहिला जनीच्या घरी
दळण दळीतो जनाबाईच्या जात्यावरी
दळण कांडण बाई मी करिते जोमान ..|| ५ ||
* * * * * *
________________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
- सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे Lyrics
- असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics
- कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा Lyrics
________________________________
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏
________________________________
Post a Comment