बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा Lyrics | Bar Zal Vithala Mi Zalo Pangala
नमस्कार या पोस्टमध्ये आपण बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा Lyrics बघणार आहोत.
____________________________________
🌹🌹बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा Lyrics 🌹🌹
(या पांगळ्याला झालो वारकरी तूझ्या
हाती पताका गंध कपाळा
तुझीच करितो पूजा )
वाईट करण्यापासून झालो वेगळा
बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा ..|| धृ ||
पाय असून लोक किती गरिबाला छळिती
कोणे कोणे पाप करून लांब लांब पळती
एका जागी लागला मला भक्तीचा लळा
बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा ..|| १ ||
लंगडत खरडत तुझ्या मंदिरी येईन
मरेपर्यंत विठ्ठलाचे नाम मी घेईन
दर्शनाची आशा करितो दास हा लूळा
बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा ..|| २ ||
तुझ नाव घेऊन मी जगतो आनंदान
सत्व तुझं ठाव ज्याला तोच भाग्यवान
देवापुढे तुम्ही आम्ही पालापाचोळा
बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा ..|| ३ ||
कमीपणा नाही मला वाटलं स्वतःचा
विठू नामामध्ये मार्ग मिळाला हिताचा
आदिनाथ बाळ तुझा आहे दुबळा
बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा ..|| ४ ||
☆ ☆ ☆ ☆ ☆
____________________________________
✅हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇📝📝
- अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी
- असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics
- गर्वाने वागू नको भल्या माणसा Lyrics
- कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा Lyrics
___________________________________
👀आज आपण या पोस्टमध्ये बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💙💙 !!!!!
____________________________________
Post a Comment