Header Ads

Andherya Vastit Bhiman Lyrics In Marathi | अंधेऱ्या वस्तीत भीमानं लिरिक्स | Bheemgeet


नमस्कार मित्रांनो ,या पोस्ट मध्ये तुम्हाला Andherya Vastit Bhiman Lyrics In Marathi लिरिक्स वाचायला मिळतील. हे बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे विष्णू शिंदे यांनी गायले आहे .


सॉन्ग - अंधेऱ्या वस्तीत भीमानं
सिंगर - विष्णू शिंदे
म्युझिक - मधुर पाठक
लिरिक्स - वामन कर्डक, गौतम सुत्रावे, राम मोरे, जि आर पालकर, गणपत शिंदे , लक्ष्मण केदार , विष्णू डांगे
अल्बम - बुद्धम सरनं गच्छामी – अमर बुद्धगीते



Andherya Vastit Bhiman Lyrics In Marathi


नरकातून ह्या निघा जगा माणूस म्हणुनी जगा
कपटी जुलमी जगा त्यागुनी, पावन जीवन बघा

नाही हादरला सांगत फिरला धडाडीने गावोगावा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा

त्या भगवंतापदी लीन तो झाला सर्वाआधी
जन हे लक्षावधी टाकिले नंतर ओटीमधी

हीन-दीनाना दुःखी जीवांना, दिला सुखाचा हा ठेवा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा

ह्या वस्तीला धनी हजारो वर्षे नव्हता कुणी
आला भीम-नरमणी टाकिली नगरी हि बदलुनी

लक्ष्मणा ही करणी पाही, जग सारं करतंय वाहवा
अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा


हे पण वाचा 👇👇👇



मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Andherya Vastit Bhiman Lyrics In Marathi बघितले. मराठी गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

धन्यवाद !!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.