-->

Header Ads

विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या Lyrics | Vithal Bhajan Marathi



🙏🙏🙏नमस्कार विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या Lyrics बघणार आहोत.

______________


🍁विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या Lyrics | Marathi🍁

संत कबीर अन नामदेवाच्या माना डोलू लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या ॥ध्रु॥

एक चोरटी आपलंच गा्हाणे मांडाया लागली
जनाबाईच्या गौऱ्या चोरूनी भांडायला लागली
भावभक्तीच्या फुलपाखळ्या जेव्हा फुलू लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या ॥१॥

महंती ऐकून जनाबाईला भेटाया आले
दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले
चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्ग चालू लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या ॥२॥

चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली
कबीराने त्या एक एक गौरी कानाला लावली
विठ्ठल विठ्ठल ध्वनी निनादे गौऱ्या हाकू लागल्या ॥३॥

धन्य माऊली खरी तू संत कबीर बोलले
लोटांगण घालून चरणी डोलाया लागले
सोपान दासा भक्तीच्या भावना खुळू लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या ॥४॥

✧✧✧✧✧


🍁विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या Lyrics | English🍁

Sant Kabir An Namdevachya Mana Dolu Laglya
Viththal Viththal Janabaichya Gaurya Bolu Laglya || Dhru. ||

Ek Chorati Aaplach Gaahane Mandaya Lagli
Janabaichya Gaurya Choruni Bhandayla Lagli
Bhavbhaktichya Phulpakhlya Jevha Phulu Laglya
Viththal Viththal Janabaichya Gaurya Bolu Laglya || 1 ||

Mahanti Aikun Janabaila Bhetaya Aale
Drushya Pahuni Sant Kabir Aashcharyachakit Jhale
Chori Karnarya Bai Tevha Marg Chalu Laglya
Viththal Viththal Janabaichya Gaurya Bolu Laglya || 2 ||

Chorlelya Gaurya Nahi Mi Janabai Bolali
Kabirane Tya Ek Ek Gauri Kanala Lavali
Viththal Viththal Dhwani Ninade Gaurya Haaku Laglya || 3 ||

Dhanya Mauli Khari Tu Sant Kabir Bolale
Lotangan Ghalun Charani Dolaya Lagale
Sopan Dasa Bhaktichya Bhavana Khulu Laglya
Viththal Viththal Janabaichya Gaurya Bolu Laglya || 4 ||

✧✧✧✧✧



✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.