Header Ads

सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी Lyrics | Sakhubai Janabai Alya Nesun Lugadi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी Lyrics बघणार आहोत.
___________________________

🌸सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी Lyrics 🌸

सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी |
पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी.. || धृ ||

पहिल्या दिवशी विठोबा आले |
फुगडीच्या खेळात रंगून गेले ||
खेळता खेळता पायात रुतली चुनखडी|
पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी.. || १ ||

दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली|
फुगडीच्या खेळात रंगून गेली ||
खेळता खेळता हातात टिचली बांगडी |
पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी.. || २ ||

तिसऱ्या दिवशी ज्ञानोबा आले |
फुगडीच्या खेळात रंगून गेले |
खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी |
पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी.. || ३ ||

चौथ्या दिवशी तुकाराम आले |
फुगडीच्या खेळात रंगून गेले ||
खेळता खेळता हातात आली टिपरी |
पंढरपुरात विठोबा खेळते फुगडी.. || ४ ||

* * * * * *
_________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏!!!!!!!

________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.