पाठीशी कृष्ण हवा कविता | Pathishi Krishna Hava Kavita | Padma Gole
🙏🙏🙏नमस्कार पाठीशी कृष्ण हवा कविता बघणार आहोत.पद्मा गोळे यांनी लिहिलेली हि कविता आहे.
______________
पाठीशी कृष्ण हवा कविता | Marathi
मौनानं होतं एवढं रामायण
हे माहीत असतं तर
शब्दांच्याच स्वाधीन झाले असते;
पण शब्दांनी नेली असती मिरवणूक
भलत्याच दिशेला.
शब्द म्हणजे अंध कौरव;
ओठात एक, पोटात भलतंच.
मौनाचं रामायण सहन करता येतं
सीता होऊन;
पण शब्दांचं महाभारत सोसायला
पाठीशी कृष्ण हवा.
- पद्मा गोळे
❖ ❖ ❖ ❖
पाठीशी कृष्ण हवा कविता | English
Maunan Hotan Evadh Ramayan
He Mahit Asatan Tar
Shabdanchyach Swadhin Jhale Aste;
Pan ShabdanI Neli Aste Miravanuk
Bhaltyach Dishela.
Shabd Mhanje Andh Kaurav;
Othat Ek, Potat Bhaltanch.
Maunach Ramayan Sahan Karta Yetan
Sita Houn;
Pan Shabdanch Mahabharat Sosayla
Pathishi Krushna Hava.
— Padma Gole
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________
👀तर आज या पोस्टमध्ये पाठीशी कृष्ण हवा कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment