-->

Header Ads

Short Poem On Nature In Marathi | निसर्गावर आधारित छोटया कविता



🙏🙏🙏नमस्कार  Short Poem On Nature In Marathi बघणार आहोत. निसर्गावर आधारित छोट्या कविता इथे आपण पाहणार आहोत.

______________


💫Short Poem On Nature In Marathi💫

सहा ऋतूंचे
सहा सोहळे
येथे भान हरावे,
या जन्मावर,
या जगण्यावर,
शतदा प्रेम करावे!


- मंगेश पाडगावकर

✧ ✧ ✧ ✧ ✧



गंध दान
करून फुलाला
कोमेजण्याचं
बळ येतं...

- व. पु. काळे



✧ ✧ ✧ ✧ ✧


कोमल हळवी उदास झाली
मावळतीची किरणे
आत आतुनी दाटून आली
विस्मृत काही स्मरणे..!

- शांता शेळके

✧ ✧ ✧ ✧ ✧



सकाळी अंगणातला पारीजात
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो ...
रिते होण्यातलं समृद्धपण
तो किती सहजपणाने दाखवतो .....

✧ ✧ ✧ ✧ ✧



"पारिजातकाचं आयुष्य
लाभलं तरी चालेल,
पण लयलूट करायची
ती सुगंधाचीच, वपु काळे"

✧ ✧ ✧ ✧ ✧



चाफ्याच्या सुगंधाने धुंद
होणारा माणूस मोगऱ्याच्या
वासाला विसरतो असं
थोडेच आहे...

- व.पु.काळे

✧ ✧ ✧ ✧ ✧



ओघळून चाफा मंद दरवळे
तसा जीव जळे आठवांत..
आठव... चाफ्याचा सडा
मन भर हळवा प्रहर पहाटेचा

 - गुरु ठाकूर

✧ ✧ ✧ ✧ ✧



आभाळ आणि मातीमध्ये
पावसाची नाळ असते
नाळच जर कधी तुटली
तर झाडांची अबाळ असते..

✧ ✧ ✧ ✧ ✧



आभाळ आपलं गात असतं
चांदण्यांचं निमित्त करून
माती मनात झुरत असते
झाडाचं शल्य धरून...

✧ ✧ ✧ ✧ ✧


पाखरं झाडांवर चिवचिवतात
काही तर गाणी गातात...
एखादाच पारवा घुमत राहतो
झाडाच्या अबोल दुःखाचा
एक अनोखा शब्द होतो...

- दासू वैद्य


✧ ✧ ✧ ✧ ✧




निसर्ग अगदी मातृत्वाने
झाड जंगल जगवते
त्यावर विश्वास ठेवून तर
नवीन रोपटे उगवते...

- अनिकेत

✧ ✧ ✧ ✧ ✧



'आभाळ'म्हटलं की त्यांनी भरून यावं'
सूर'म्हटलं की तिने बरसून जावं'
मेघ'म्हटलं की धरेवर बरसत रहावा'
थेंब'म्हटलं की तो ओंजळीत
जपून ठेवावा...

- संजाली

✧ ✧ ✧ ✧ ✧



एका मंद सायंकाळी बसलो होतो सागर किनारी...
सूर्य क्षितिजावर नुकताच निजला होता..
शब्द मनातून ओठात येऊन थिजला होता..
कागदावर वेचित ते शब्द झालो मी रिता..
गुंफून माळ शब्दांची बनली एक कविता.

- अमेय डोंगरे

✧ ✧ ✧ ✧ ✧




लाटा


विसावल्या लाटा
शोधीत पायवाटा
जाती घाटातून
हिरव्या पाचूच्या बेटा ....

कातळाचा साकव
पक्ष्यांचा कलरव
निबीड रानातून
वन्य पशूंचा पायरव ....

कधी प्रवाह शांत
कधी जलधि अशांत
वाहतो सांडव्यातून
खळखळणारा प्रपात ....

रानफुलांशी हितगुज
वाजवी वारा अलगुज
अवखळ झऱ्यातून
ऐक सूरांची कुजबुज ....

-स्वरदा गोडबोले.

✧ ✧ ✧ ✧ ✧


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये Short Poem On Nature In Marathi बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या. तुम्हाला या कविता कशा वाटल्या ते नक्की सांगा.

______________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.