बाप कविता मराठी इंद्रजित भालेराव 👤 Bap Kavita In Marathi
🙏🙏🙏नमस्कार बाप कविता मराठी इंद्रजित भालेराव बघणार आहोत.
______________
बाप कविता मराठी इंद्रजित भालेराव | Marathi
शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप
लेतो अंगावर चिंध्या,
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पायी,
त्यानं काय केलं पाप ?
कष्ट सारे त्याच्या हाती
दुसऱ्याच्या हाती माप
बाप फोडतो लाकडं
मे पेटवीते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचच खातो
जग करी हापाहाप !
- इंद्रजीत भालेराव
❖ ❖ ❖ ❖
बाप कविता मराठी इंद्रजित भालेराव | English
Shetamadhi Majhi Khop
Tila Boratichi Zhap
Tith Rabto, Kashtto
Majha Shetkari Bap.
Leto Angavar Chindhya
Khato Mirchi Bhakar
Kadhi Usachi Pachat
Jaga Milaya Sakhar.
Kata Tyachyach Ka Payi
Tyane Kay Kela Pap?
Kasht Sare Tyachya Hati
Dusaryachya Hati Map.
Bap Phodto Lakad
May Petvite Chulha
Pithamaglya Ghamachi
Kay Chav Sangu Tula.
Amhi Kashtachach Khato
Jag Kari Hapahap!
— Indrajit Bhalerao
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- पिवळे तांबूस ऊन कोवळे मराठी कविता
- समुद्र कोंडून पडलाय कविता
- गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या कविता
- माय मराठी कविता
______________
👀तर आज या पोस्टमध्ये बाप कविता मराठी इंद्रजित भालेराव बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment