यात्रा सोमवतीची भरली भक्तीगीत Lyrics | Khandoba Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण यात्रा सोमवतीची भरली भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
__________________
🌸यात्रा सोमवतीची भरली भक्तीगीत Lyrics 🌸
यात्रा सोमवतीची ही भरली
अहो यात्रा सोमवतीची ही भरली
जेजुरीचा सोहळा ग
खंडेराया झाला माझा पिवळा ग..|| धृ ||
पंचप्राणांची लावूनी आरती दीपांच्या ज्योती हं...
मल्हारीला ओवाळू गं...
ग बाई बाई मल्हारीला ओवाळू गं...
भरीत रोडग्याचा नैवेद्य देते
पान बेलाचं चरणाला वाहते
जय मल्हार येळकोट बोलून
अहो जय मल्हार येळकोट बोलून
भंडारा उधळला गं...
खंडेराया झाला माझा पिवळा ग...|| १ ||
बानू म्हाळसा माझी आई
मला खंडोबा माया देई
कुठ जाईल सोडून त्यांना
अहो कुठ जाईल सोडून त्यांना
जीव माझा बावळा ग
अहो जीव माझा बावळा ग
खंडेराया झाला माझा पिवळा ग...|| २ ||
नको बाई दाग दागिन
देव मल्हारी माझं सोनं
धन दौलत धरणी मिळाली
देव मोती पोवळा ग
अहो देव मोती पोवळा ग
खंडेराया झाला माझा पिवळा ग...|| ३ ||
देव फुलवितो बाग सुकलेली
तोच जुळवितो भाग्य फुटलेली
संजू भाऊ काव्यातून वर्णी
अहो संजू भाऊ काव्यातून वर्णी
मार्तंड सावळा ग
अहो मार्तंड सावळा ग
खंडेराया झाला माझा पिवळा ग...|| ४ ||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment