-->

Header Ads

मोठं मोठं डोळं घाली मिशावर ताव भक्तीगीत Lyrics | Khandoba Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण मोठं मोठं डोळं घाली मिशावर ताव भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
_____________________


🌸मोठं मोठं डोळं घाली मिशावर ताव भक्तीगीत Lyrics🌸

मोठं मोठं डोळं घाली मिशावर ताव
अन जेजुर गडावर नांदे देव खंडेराव

अहो काळ्या घोंगडीची म्हणू देवाला आवड
जाईच्या झाडाखाली बानू घालती रेवड

अहो म्हाळसा ग म्हणे मी ग वाण्याचं लेकरू
अहो धनगराची बानू हिला लागतं वखरू

म्हाळसा ग म्हणे मी ग वाण्याचं ग मुल
ही धनगराची बानु हिनं बाटवली चूल

अहो बानू म्हाळसाच्या दोघींच्या दोन जाती
त्या खंडेराया साठी दोघी जेवल्या एका ताटी

जेजुरगडावर मेंढ्या फिरती चरुन
या बानू वर भंडार पडतो चोरून

मोठं मोठं डोळं घाली मिशावर ताव
अन जेजुर गडावर नांदे देव खंडेराव

_____________________


ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

_____________________

आज या पोस्टमध्ये आपण मोठं मोठं डोळं घाली मिशावर ताव भक्तीगीत Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 🙏🙏!!!

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents