हसा मुलांनो हसा बालगीत Lyrics | Hasa Mulano Hasa Balgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण हसा मुलांनो हसा बालगीत Lyrics बघणार आहोत.
__________________
👨👩हसा मुलांनो हसा बालगीत Lyrics 👨👩
प्रकाशातले तारे तुम्ही... अंधारावर रुसा
हसा.... मुलांना हसा...|| धृ ||
तुम्हा बोलवी ती फुलराणी
खेळ खेळती वारा पाणी
आनंदाच्या शिखरावरती
खुशाल जाऊन बसा
हसा.... मुलांना हसा...|| १ ||
रडणे हा ना धर्म आपला
हसण्यासाठी जन्म घेतला
भारतभूच्या आदर्शाचा
मनी उमटू दे ठसा
हसा.... मुलांना हसा...|| २ ||
सर्व मागचा विसरा गुंता
अरे उद्याच्या नकोत चिंता
बघा अरुण तो बाळांनो रे
तुम्हा खुणावितो कसा रे
हसा.... मुलांना हसा...|| ३ ||
__________________
✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀आज या पोस्टमध्ये आपण हसा मुलांनो हसा बालगीत Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
__________________
Post a Comment